fbpx

नोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली

टीम महारष्ट्र देशा : नोटाबंदी नंतर आता नाणेबदली होणार असून केंद्र सरकार आता लवकरच एक रुपयाच्या नाण्यापासून ते १० रुपयाच्या नाण्यांमध्ये बदल करणार आहे. तसेच २० रुपयाचे नवीन नाणे देखील बाजारात येणार आहे. या नाण्याची रचना अष्टकोनी असणार आहे तसेच अंध व्यक्तीलाही ते नाणे सहजच ओळखता येणार आहे.

नोट की नाणे या विचारमंथनानंतर अखेर 20 रुपयाचं नाणं अंतिम झालं आहे. याआधी केंद्र सरकारने नोटाबंदी केली होती त्यानंतर नोटांमध्ये विशेष बदल घडवून आणले. खास करून २००० ची नोट नव्याने बाजारात आणली.त्यानंतर दहा रुपयाच्या नोटे पासून ते ५०० रुपयांच्या नोटे मध्ये बदल झाले. याच अनुषंगाने सरकार आता एक रुपयांच्या नाण्यापासून ते 10 रुपयांच्या नाण्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या नवीन नाण्यांचे डिझाईन तयार झाल्याचे समजते.

नोटा आणि नाण्यांवर असणाऱ्या डिझाईन वरून देशाची रचना झळकत असते तसेच काही सामाजिक संदेश दिले जातात. २० रुपयाच्या नाण्यावर देखील अशाच प्रकारचा सामाजिक संदेश असणार आहे.

2 Comments

Click here to post a comment