दिल्लीत चमचे कधी तुटतं नसतात ; ते फक्त एका कपातून दुसऱ्या कपात जातात

Amar sinh

पुणे : नुकतंच काही दिवसापूर्वी समाजवादी नेते अमर सिंह यांचं निधन झालं. त्यावेळी ‘ व्हेंम ऑरगॅनिक’ या कंपनीत लायझनिंगचे काम करणारा अमर सिंह नावाचा एक तरुण थेट ‘ लुटेंस दिल्लीत किंवा खान मार्केट ‘ मध्ये खुषमस्करे,चमचे आणि भाट यांची मदत घेत आपली वेगळी इमेज कशी निर्माण करू शकला याच्या बऱ्याच स्टोऱ्या माध्यमात छापून आल्या आणि त्या खूप गाजल्या देखील.

तशीच काहीशी आठवण जेष्ठ पत्रकार दिवंगत अशोक जैन यांनी आपल्या ‘ राजधानीतून ‘ या पुस्तकात सांगितली आहे. जैन एका ठिकाणी म्हणतात ” दिल्लीत कधी कुणाची लॉटरी सुटेल याचा काही नेम नाही आणि एकदा का लॉटरी सुटली की मग तुमच्या भोवती खुषमस्करे,चमचे आणि भाट यांचा गोतावळा जमा होतो. दिल्लीत तर अशा चमच्यांची प्रचंड वसाहत आहे. याला माजी मंत्री भागवत झा गमतीत ‘ चवनप्राश संस्कृती ‘ “असे म्हणतात.

अशोक जैन पुढे असं म्हणतात ” संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर मनेका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावं असे पत्रकं काही काँग्रेस नेते काढत होते.पण इंदिरा गांधींनी मनेका यांच्या ऐवजी राजीव गांधी यांच्या नावाला पसंती दिली.तेव्हा लागलीच या पत्रकं काढणाऱ्या नेत्यांनी आपली ‘ तोंड फिरवली ‘ आणि राजीव गांधी यांच्या नावाने पत्रकं काढली. याच सुमारास संसदेच्या अनेक्स या बिल्डिंग मध्ये मला भागवत झा भेटले.तेथे कुठली तरी पत्रकार परिषद चालू होती. मधल्या चहापानाच्या कार्यक्रमावेळी तेथील प्रशस्त दालनात चहा, कॉफीसाठी कप आणि चमचे हारिने मांडून ठेवले होते आणि पाहिजे तेवढी साखर घेण्यासाठी बाजूला साखरेचं क्यूँब होते. आम्ही आपापला चहा घेत गप्पा मारू लागलो.”

इतक्यात भागवत झा यांच्या हातातला चमचा सुटला आणि खाली पडला. त्या चमच्याचे चक्क दोन तुकडे झाले. खरंतर चमचा चांगला जाडजूड होता आणि जमिनीवर गालिचा देखील चांगला गुबगुबीत होता. तरीपण चमचा फुटला कसा याचेच आश्चर्य वाटत भागवत झा मला म्हणाले ” अरे हे कसं झालं? दिल्लीतले चमचे कधीच तुटतं नसतात. ते एका कपातून दुसऱ्या कपात जातात. राजीव, मेनका यांच्या तत्कालीन वादात चमचेगिरी,भाटगिरी करणाऱ्या लोकांना हा चपखल टोला होता आणि दिल्लीतल्या या ‘ रंग बदलू ‘ लोकांवर ते भाष्य होतं.” दिल्लीतले चमचे कधी फुटत नसतात; तर ते एका कपतून दुसऱ्या कपात जातात.

महत्वाच्या बातम्या:-

संपूर्ण लॉकडाऊन करणे हा विषय आता संपलाय – राजेश टोपे

‘अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही, विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये’

…नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा

उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्यास मारहाण; महाराष्ट्रात ‘गुंडाराज’ – प्रवीण दरेकर

वर्ध्यातील महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी खासदारांचा पुढाकार, बघा काय मिळणार सोयी