राणेंच्या प्रवेशाची पक्षात साधी चर्चा देखील नाही :चंद्रकांत पाटील

chandrakant patil

वेब टीम:माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच कॉग्रेसला सोडचिट्टी दिली असून ते आता भाजप मध्ये दाखल होणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे मात्र सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राणे विषयी भाजपच्या कोर कमिटीत कोणतीही चर्चा नाही असे सांगून मोठा गौप्यस्फोट केला आहे . त्यामुळे राणे भाजपमध्ये प्रवेश करणार ही शक्यता धूसर झाली आहे .

पुण्यातील बंडगार्डन येथे सीएसआर अंतर्गत जलसंधारणाची जलदूत योजना लोकार्पण सोहळ्यास आज चंद्र्कांत पाटील उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले नारायण राणे यांच्यासाठी मी माझं मंत्रिपद सोडणार या वाक्याचा विपर्यास करण्यात आला . नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशा बाबत भाजप कोर कमिटीमध्ये कोणती हि चर्चा नाही किंवा कुठल्या आमच्या नेत्यांच्या संपर्कात राणे नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. तसेच १५ ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.त्यामुळे नारायण राणे यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता कमी झाली आहे तसेच राणे आणि भाजपमध्ये नक्की काय खलबत चालली आहेत याबाबत चर्चाना उधाण आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!