छत्तीसगडमध्येही रुग्णालयात प्राणवायूअभावी तीन मुले दगावली

रायपूर :  येथील आंबेडकर रुग्णालयात प्राणवायूअभावी काल रात्री 3 बालकांचा मृत्यू झाला. कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.मुलांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याचा आरोप मृत बालकांच्या कुटुंबियांनी केला आहे. डॉक्टरांविरूद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे.मात्र बालकांचा मृत्यू प्राणवायूअभावी झाल्याचे वृत्त आरोग्य संचालक आर. प्रसन्ना यांनी फेटाळून लावले .  आजार बळावल्यामुळे या तीन बालकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.