चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

चंद्रपूर : राज्यात, आणखी २३कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून आता राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ८९२ झाली आहे. नवीन २३ रूग्णांमध्ये १० रूग्ण मुंबईत आढळले असून पुणे शहरात ४, अहमदनर -३, बुलडाणा आणि नागपूर इथं प्रत्येकी २, तर सांगली आणि ठाण्यात प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत ५२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यृ झाला आहे.

देशभरात कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ४२१ वर पोचली असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११४ झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. उपचारानंतर ३२५ रुग्ण यातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकहीरुग्ण नसल्यानं रोजच्या गरजेच्या काही वस्तूंची दुकानं आजपासून सुरू करायचा निर्णयघेतला असून, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत त्यांना वेळ दिली आहे.

नाशिक शहरातच्या गोविंद नगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेनं कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णाच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटर परिघात नागरिकांना आगामी चौदा दिवस निर्बंध घालण्याचे निर्देश प्रशसनानं दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयानं कोरोना पडताळणीसाठी पाठवलेले आणखी पाच आहवाल नकारात्मक आले आहेत. रुग्णालयानं पाठवलेल्या ६३ पैकी फक्त एका नमुन्याचा अहवाल बाकी असून इतर सर्व अहवाल प्राप्त झालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विलगीकरण कक्षामध्ये सध्या २२ व्यक्ती दाखल आहेत.

परभणीत पोलीसांच्या सहकार्यासाठी एसआरपी अर्थात राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या परभणीत दाखल झाल्या आहेत. नानलपेठ, नवामोंढा, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तुकड्या कार्यरत राहतील असे पोलीस प्रशासनानं सांगितलं.