ब्रेकिंग न्यूज : भर सभेत अज्ञात व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

टीम महाराष्ट्र देशा : गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये एका जाहीर सभेमध्ये काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली आहे. सभा चालू असतानाच एका माणसाने मंचावर येऊन हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली आहे. त्यामुळे सभेमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता.

हार्दिक पटेल हे एका जाहीर सभेमध्ये भाषण करत होते. या सभेसाठी मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी जनतेतून एक अज्ञात इसम स्टेजवर आला आणि त्याने हार्दिक पटले यांच्या कानाखाली पेटवली. यानंतर अज्ञात इसमाला कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण सभेमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळाला आहे.

दरम्यान याआधी देखील असे प्रकार अन्य नेत्यांच्या बाबतीत अनेकदा घडले आहेत. भाजपच्या दिल्लीमधल्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना एका व्यक्तीने खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर बूट फेकून मारला होता.Loading…
Loading...