बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांनी निवडणुकीचे मैदान जिंकले

बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी निवडणुकीचे मैदान जिंकले. शिवसेनेने बीड विधानसभा मतदारसंघात अभूतपूर्व मुसंडी मारली. ग्रामीण भागात शिवसेनेचे आणि जयदत्त क्षीरसागरांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. २९ ग्रामपंचायतीपैकी २१ ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. बीड आणि शिरूर तालुक्यातील ३५ पैकी २५ ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना कौल दिला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे जयदत्त क्षीरसागरांनी सत्कार केला.

निडणुकीपूर्वीच बीड मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ४ ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये रायमोहा, टाकळवाडी, व्हरकटवाडी, भानकवाडी यांचा समावेश आहे. तसेच बीड मतदारसंघात मौज, ब्रम्हगाव, मौजवाडी, मैंदा पोखरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, कारळवाडी, निर्मळवाडी, कर्जणी, कोळवाडी, गुंधा, जिरेवाडी, पिंपळगाव घाट, वासनवाडी, वंजारवाडी, गुंदावाडी, वायभटवाडी, बाळसापूर, बेलखंडी पाटोदा, वरवटी, आहेरधानोरा, मानेवाडी, भंडारवाडी या २१ ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे.

महत्वाच्या बातम्या