बार्शीमध्ये अवकाळी पावसाने चिक्कू च्या बागेचे नुकसान

farmer rain

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे अचानक आलेल्या वादळी वारे आणि पावसाने शेतकऱ्याच्या चिक्कू बागेचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन सुरु असल्याने बळीराजाचा माल कवडीमोल भावाने विकला जात असून त्यातच झालेल्या पावसाने बळीराजाचे कंबरडे च मोडले आहे.

आगळगाव मधील सतिश श्रीमत गरड यांची २ एकर चिक्कू ची बाग, यामध्ये सुमारे ३०० झाडे असून सर्व झाडांना चिकू लागला आहे. माल काढायची २ दिवसात सुरवात करणार तोच अवकाळी पावसाने सतिश गरड यांच्या चिक्कू बागेचे अतोनात नुकसान केलं. वादळी वाऱ्यामुळे चिक्कू च्या झाडांचा निम्मा माल खाली पडला तर काहि झाडे मोडून आणि भरगच्चं चिकू असलेल्या झाडाचे फाटे तुटून पडल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

दरम्यान, मान्सून येत्या 24 तासात अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंफन या येऊ घातलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तो अंदमानात आपल्या 22 मे या नव्यानं निर्धारित तारखेपेक्षा 5-6 दिवस आधीच येतो आहे.

रेल्वेनं तब्बल १२ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्यात पोचवलं

केरळ मध्ये मात्र तो 1 जून या निर्धारित तारखेपेक्षा काहीसा उशीराच अपेक्षित आहे. 5 जूनच्या आसपास मान्सूनचं केरळात आगमन होईल असा अंदाज हवामानखात्यानं आज वर्तवला आहे. यात 4 दिवस कमीजास्त होऊ शकतं. गेल्या पाच वर्षांचा इतिहास बघितला तर मान्सून 2 वर्ष हवामान विभागानं ज्या तारखेचा अंदाज वर्तवला होता त्या तारखेलाच आला होता. 2 वर्ष तो 1 दिवस उशिरा आला. फक्त 2015 साली त्यानं अंदाजापेक्षा 6 दिवस उशीर केला होता.

केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय ; अमोल कोल्हे यांचा थेट मोदी सरकारवर हल्लाबोल