औरंगाबादेत बसच्या एक्सलेटरचे नट निखळले; मोठा अपघात टळला!

st bus

औरंगाबाद : औरंगाबादहून शिर्डीकडे जाणाऱ्या धावत्या बसच्या एक्सलेटरचे नट निखळल्याचे सोमवारी (दि. ११) श्रीरामपूर बसस्थानकाच्या जवळ लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेतली. यामुळे थोडक्यात मोठा अपघात टळला. या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना केले. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. सोमवारी (दि.११) औरंगाबादेतून शिर्डीकडे जाणारी बस (क्र. एमएच-१४ बीटी- २६४२) निघाली. बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. बस श्रीरामपूर बसस्थानकाच्या जवळ जाताच हेलकावे खात असल्याचे चालकाला जाणवले. चालकाने गाडी थांबवून पाहिले असता सर्वच अॅक्सलेटरचे नट निखळल्याचे त्याच्या लक्षात आले. गाडीची पूर्ण तपासणी करूनच रस्त्यावर सोडणे आवश्यक असतानाही अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. धावत्या बसचे पूर्ण अॅक्सलेटरते नट निखळले होते. चालकाने दोन नट बसवत गाडी दुरुस्तीसाठी श्रीरामपूर आगारात नेली. ही बाब चालकांच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अपघात टळला. घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने शिर्डीकडे रवाना केले.

महत्त्वाच्या बातम्या