शरद पवार हे बोलत बोलत चुना लावून जाणारे वाटतात : प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा- शरद पवार हे डावीकडेही झुकले आहेत आणि उजवीकडेही . आमच्या भटक्यांमध्ये बोलत बोलत चुना लावून जाणारेही असतात, तसे ते वाटतात’, अशा शब्दात पवारांची खिल्ली भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडवली आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी

शरद पवार हे कधीही शेतकऱ्यांचे नेते नव्हते आणि नाहीत. ते पुरोगामीही असतात आणि प्रतिगामीही. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात त्यांच्या बरोबर आघाडीशी बोलणी झाली, तर आमच्याकडून अटी टाकल्या जातील, असे आंबेडकर यांनी सांगितले.

काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी
लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर राजकीय आघाडी होऊ शकते, असे सांगत काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्यास सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.काँग्रेसबरोबर आघाडी करावयाची झाल्यास लोकसभेच्या १२ जागा वंचित बहुजन आघाडीला द्याव्यात, असा प्रस्ताव आहे. मात्र, कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसने जागा वाटप करताना दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्याशी संबंधित गटाला चार जागा दिल्या नव्हत्या. त्यामुळे ते आघाडीसाठी किती पुढे येतात, हे पाहावे लागेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांशी बोलणी करू, असे म्हटले होते. त्याचे काय झाले, असे विचारले असता प्रकाश आंबेडकरांनी आघाडीबाबतची शक्यता नाकारली नाही.

नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर

एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष, आघाडीची बोलणी होऊ शकते : प्रकाश आंबेडकर
एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर निवडणुकीमध्ये आघाडीची बोलणी होऊ शकते.ओवेसी आणि कांशीराम यांच्या राजकारणाचा पोत कसा सारखाच आहे असे सांगत ओवेसी यांच्यामागे राजकीयदृष्टय़ा मुस्लीम समुदाय वळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडीची नवी समीकरणे जुळवून येऊ शकतात, असे संकेत आंबेडकर यांनी दिले.

प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत

You might also like
Comments
Loading...