औरंगाबाद जिल्ह्यात १२८ ग्रामपंचातयींपैकी १८५ जागा रिक्त; २१ डिसेंबरला होणार निवडणूक

औरंगाबाद जिल्ह्यात १२८ ग्रामपंचातयींपैकी १८५ जागा रिक्त; २१ डिसेंबरला होणार निवडणूक

election

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचातयींपैकी १८५ जागा रिक्त आहेत. त्यामुळी येणाऱ्या २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून निवडणुका होत आहेत. तहसील कार्यालयांमध्ये निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil chavan) यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील वीस ग्रामपंचायतीत २६ जागा रिक्त आहेत. पैठणमध्ये १४ ग्रामपंचायतीत १७ जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे फुलंब्रीत २०, वैजापूरमध्ये २९, गंगापूरमध्ये २०, कन्नडमध्ये २१, खुलताबादमध्ये १९, सिल्लोडमध्ये २१ तर सोयगावात १२ जागांवर पोटनिवडणूका घेण्यात येतील. निवडणूक कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ९ डिसेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे. तर त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. तर २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार निश्चित करतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या