fbpx

विधानसभेला मला शिवेंद्रराजेंचे काम करावं लागेल

udyanraje vr shivendraraje

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जाणाऱ्या नेत्यांमध्ये काही शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांचा देखील समावेश आहे. तर पवारांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सातारचे खा.उदयनराजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. कारण खुद्द खा. उदयनराजे भोसले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे प्रथमच साताऱ्यात आले होते. यावेळी शिवेंद्रराजे यांच्याविषयी बोलताना’ धाकटे बंधू असल्यामुळे मला त्यांचे काम करावेच लागेल. लहान मुलाने काहीही केले तरी आपण त्याला सोडत नाही. त्यांनी चांगली दाढी वाढविली आहे. मला तर वाटते, की त्यांनी एखाद्या चित्रपटात काम करावे. सुपरहिट होईल असं विधान केले.

तसेच रामराजे आणि स्वतः च्या भाजप प्रवेशावर बोलताना त्यांनी रामराजे व शिवेंद्रसिंहराजे हे दोन्ही राजे आहेत. माझी त्यांच्याशी तुलना करू नका. रामराजे वयाने व मानानेही मोठे आहेत. त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतली. मला त्यांच्याशी जोडू नका. त्याच बरोबर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जिल्ह्यात येणार आहे, त्याला जाणार का या प्रश्नावर यात्रा तर सर्वांच्याच निघतात. आमची स्वत:ची जत्रा असताना दुसऱ्यांच्या यात्राला कशाला जायचे असं विधान करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहणार नाही असे संकेत दिले आहेत.

तसेच भाजप प्रवेशावर सूचक विधान करताना त्यांनी ‘माझे सर्व पक्षांत मित्र आहेत. कोणाला भेटलो, की लगेच निघालो, असे होत नाही. सत्तेसाठी लाईन लावणारा मी नाही. मात्र, ज्या-त्या वेळेस लोकांच्या हिताचा जो निर्णय असेल, लोकांना योग्य वाटेल, तो कोणताही निर्णय असला, तरी मला घ्यावाच लागेल. पक्ष कोणताही असला तरी आजवर मी सामान्यांशी बांधिलकी सोडली नाही. मनाला पटतो तोच निर्णय मी घेतो. काय करायचे ते वेळ आल्यावर ठरवू असं विधान केले.