कोणत्याही परिस्थितीमध्ये जवान शत्रूला लढा देऊ शकतात – निर्मला सितारामन

नवी दिल्ली : लष्कराकडे पुरेसा शस्त्रसाठा असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले जवान शत्रूला लढा देऊ शकतात,असे प्रतिपादन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. बाडमेर दौ-यावर असतांना त्या बोलत होत्या.

भारतीय लष्कराकडे प्रचंड क्षमता असून ते शत्रूला नामोहरण करू शकतात. तसेच काही दिवसांपूर्वी लष्कर प्रमुखांनी जवानांना पाकिस्तान किंवा चीनशी लढण्यासाठी  तयार राहण्यास सांगितले होते. मात्र, लष्कराने युद्ध करायचे हे लक्षात घेण्यापेक्षा आपल्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे,असेही त्या म्हणाल्या.