नवी दिल्ली: पुदुचेरी विधानसभेचा कार्यकाळ २१ जून २०२१ रोजी संपणार आहे. पण कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम चार महिने उरले असताना पुदुचेरीत अस्थिरता निर्माण झाली. मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आणि काँग्रेसचे सरकार पडले. नारायणसामी यांनी पदाचा राजीनामा दिला.
बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.यात नारायणसामी सरकारचा पराभव झाला.विधानसभेत बहुमत सिद्द न झाल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नायब राज्यपालांकडे पाठवला आणि आता ते पायउतार झाले आहेत.
Puducherry Chief Minister submits resignation to the Lieutenant Governor after losing majority in the Assembly pic.twitter.com/Y2posu1zXQ
— ANI (@ANI) February 22, 2021
अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांना आपला राग अनावर झाला. बहुमत ठराव मांडण्याआधी नारायणसामी यांनी, ‘पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे .
दरम्यान,पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले असले तरी एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्तेत येणे काँग्रेससाठी अवघड बाब मानली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; ५१५ नव्या रुग्णांची भर, ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
- जालनेकरांनो नियम पाळा; ९६ नवे बाधित रुग्ण, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू
- …म्हणून समरजितसिंह घाटगे यांनी उपसले उपोषणाचे हत्यार
- राज्यात २४ तासात ३५ रुग्णांचा मृत्यू, तरी महाराष्ट्र बिनधास्त!
- कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेवून सेनेने केले ‘शिवसंपर्क अभियान’ स्थगित