राज्यातील आणखी एका जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

lockdown

अलिबाग : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यातली जिल्हधिकारी, पालकमंत्री, प्रशासन आपआपल्या पद्धतीने पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेत आहेत. पुणे, सोलापूर नंतर आता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्ह्यात १५ ते २४ जुलैदरम्यान १० दिवस लॉकडाऊन लागू राहणार आहे. या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

दरम्यान , महाराष्ट्रात कोरोनाच्या ७,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार झाली आहे. अवघ्या सहा दिवसांमध्ये राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ५० हजाराने वाढली. गेल्या २४ तासांत राज्यात १७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ही १०,२८९ झाली.

अक्षय कुमारचा येणारा ‘हा’ चित्रपट आणखी लांबणीवर

राज्यात कोरोनाचा हाहाकार,आणखी एक महत्वाची परीक्षा सरकारने केली रद्द

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी मनसेने केली ‘हि’ मागणी