अकोल्यात यशवंत सिन्हा आणि ‘स्वाभिमानी’चे रविकांत तुपकरांना अटक

टीम महाराष्ट्र देशा: शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करणारे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. अकोला येथे स्वाभिमानीकडून सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत होतं.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेते आणि सध्या मोदी विरोधी चेहरा म्हणून चर्चेत असणारे यशवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात येत होतं.