fbpx

अहमदनगरमध्ये भाजपची पत हि गेली आणि पदही गेले

ahmadnagr mahapalika

अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची महापालिकेतून हकालपट्टी करण्यात आली. अहमदनगर महापालिकेत छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तसेच छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला. उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

दरम्यान, अहमदनगर महापालिकेच्या ५ मार्च रोजी होत असलेल्या उपमहापौर निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीने माघार घेतली आहे. मुंबई येथे आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, अभय आगरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘महाराष्ट्र देशा’ ने भाजप शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्याशी संपर्क साधला असता. त्यामी श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा  प्रायश्चित्त व निषेध  म्हणून भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

1 Comment

Click here to post a comment