300 रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक जाळ्यात

पुणे – वकीलाकडे 300 रुपये लाच मागून त्यातील तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील कनिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (6 फेब्रुवारी) दुपारी करण्यात आली. शरद रामदास पालवे (वय – 26, रा. नाथनगर मु.पो. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) असे लाचखोर कर्मचा-याचे नाव आहे. तो शिवाजनगर न्यायालयात कोर्ट 29 नंबरच्या कोर्टात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे.

याप्रकरणी एका वकील तक्रारदाराने तक्रार दिली होती. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे पक्षकारांचे अर्ज क्र. 3500/2016 प्रकरणाची निशाण 1 व आदेश नक्कल विभागात पाठवण्याचा मोबदला म्हणून शरद पालवे याने 500 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 300 रुपयांवर हा व्यवहार ठरला. त्यानंतर तक्रारदाराने याची माहिती तक्रार दिल्यानंतर शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील कोर्ट नंबर 29 च्या कक्षाबाहेर तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना शरद पालवे याला रंगेहात पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे

You might also like
Comments
Loading...