पंकजा मुंडेंनी दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा साधा नामोल्लेख केला नाही

Pankaja Munde - Devendra Fadnavis

प्रदीप मुरमे – भाजपाच्या वजनदार नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी रविवारी एका खासगी वृत वाहीनीला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा साधा नामोल्लेख देखील न केल्याने भाजपा गोटातून उलट सुलट मत प्रवाह ऐकावयास येत आहेत.

रविवारी प्रसारीत झालेल्या या मुलाखतीच्या माध्यमातून विधानपरिषद निवडणूकीनंतर त्या प्रथमच माध्यमासमोर आल्याने त्या नेमकं काय बोलतील याबाबत राजकीय वर्तुळामध्ये कमालीचे औत्सुक्य लागून राहिले होते. विधान परिषद निवडणूकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही! या मुलाखतीमध्ये त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतच्या अनेक आठवणी जागविल्या. ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीबाबत त्यांनी भाष्य केले.त्याचबरोबर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी गोपीनाथ गडावर न येता आपल्या घरी राहूनच पुण्यतिथी साजरी करावी. मुंडे साहेबांच्या फोटो समोर दोन दिवे प्रज्वलीत करुन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देवून मुंडे साहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन केले.

विधानपरिषदेची उमेदवारी डावलण्यात आल्याबाबत छेडले असता आपण पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली नव्हती. पक्षश्रेष्ठीचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सांगून उमेदवारी न मिळाल्याबद्दल आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार कोरोनाच्या संकटावर उपाययोजना करत आहे. परंतु यामध्ये आणखीन वाढ होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. पक्षातील नेत्यांबरोबरच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यावेळी बोलताना भाजपातील नेत्यांबरोबरच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचा त्यांनी नाव घेवून आवर्जून उल्लेख केला. परंतु यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या जोडगोळीचा पंकजा यांनी साधा नामोल्लेख देखील केला नसल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत बोलताना मात्र आम्हा उभयतांमध्ये बहिण-भावाचे नाते असल्याचे सांगितले. तर सध्या आपण राजकारणात बाजूला पडल्याचे चित्र दिसत नाही का? या प्रश्नावर मात्र त्या चांगल्याच भडकल्या.मी राजकारणात बाजूला पडले असते तर आपण मला आपल्या वाहिनीवर बोलावल नसतं हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. एकुणच सध्या भाजपमध्ये नेत्यांमध्ये मोठी कुरबुर पाहायला मिळते. नुकतच झालेल्या विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजाताई मुंडे आदींना उमेदवारी नाकारण्यात आल्याने भाजपमधील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे.

जेष्ठ नेते खडसे यांनी याबाबतची आपली खदखद उघडपणे बोलून दाखविली तर पंकजाताई यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली नसली तरी त्यांची देहबोली मात्र नाराजी लपवू शकली नाही हेही तितकेच खरे. मुळात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडे समर्थक परंतु २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी भाजपमधील आपले विरोधक संपविण्याची राजकीय खेळी खेळत आहेत. त्या खेळीचाच एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूकीत खडसे, मुंडे या सारख्या पक्षातील आपल्या विरोधकांना बाजूला सारण्यात तूर्त तरी विरोधी पक्ष नेते फडणवीस पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत. एकुणच एकनाथ खडसे,पंकजाताई मुंडे,विनोद तावडे व बावनकुळे या सारख्या निष्ठावंतांच्या नावाचा विधान परिषदेसाठी विचार न होणे व पक्षांतर्गत कुरबुरी विचारात घेता भाजपमध्ये सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट झालं आहे,हे मात्र निश्चित!

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांच्या पत्रकार परिषदेचा केला पंचनामा, सर्व आरोपांची दिली पुराव्यासहित उत्तरं

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सातशे कोटीचे कर्ज होणार माफ

‘सावकारी सरकारने आईप्रमाणे वागले पाहिजे, पैसे कर्जरुपाने न देता खात्यात जमा करा’