‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’

‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’

kirit

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर सोमय्या आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेत कोल्हापूरच्या दौऱ्याची सुरुवात केली आहे.

दरम्यान कोल्हापुरात आल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले कि, ‘माझ्या भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही क्रांतीची सुरुवात आहे. संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारमधील अर्धे मंत्री गायब झालेले असतील तर अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.

तसेच गेल्या वर्षभरात आम्ही ठाकरे सरकारचे २४ घोटाळे बाहेर काढले आहेत. त्याची चौकशी आणि कारवाई सुरू झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख गायब होतात, देशमुख कुठे आहेत याचा पत्ता फक्त ठाकरे आणि शरद पवार यांनाच माहीत आहे. तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग फरारी होतात. मुश्रीफ रुग्णालयात दाखल झालेत. आता यापुढे अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसेल. असे स्पष्ट मत यावेळी किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या