‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’

ajit pawar

पुणे: एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिबवेवाडी परिसरात तीन तरुणांनी कोयत्याने वार केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स याठिकाणी ही घटना घडली. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान या घटनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असल्याचे अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येईल. असे आवाहन अजित पवार यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या