महाराष्ट्र देशा डेस्क: देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव मंगळवारपासून सुरू झाला आहे. 5G स्पेक्ट्रम लिलावात अदानी समूहाने प्रवेश केल्यामुळे हा लिलाव आता आणखीच अटीतटीचा होणार आहे. टेलिकॉमच्या माध्यमातून प्रथमच अंबानी-अदानी यांच्यात थेट स्पर्धा असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओने 14,000 कोटी रुपये, भारती एअरटेलने 5,500 कोटी रुपये आणि व्होडाफोन-आयडियाने 2,200 कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचवेळी 5G च्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अदानी डेटा नेटवर्कने 100 कोटी रुपये जमा केले आहेत.
मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने लिलावापूर्वीच सर्वात जास्त रक्कम जमा केली आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की जिओ या लिलावात सर्वात आक्रमक बोली लावू शकते. त्याचबरोबर, अदानी समूह त्याच्या उपकंपनी अदानी डेटा नेटवर्कतर्फे बोली लावणार आहे. तसेच भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया देखील या बोलीमध्ये सहभागी होणार आहेत. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबत अहवाल जारी करताना जेफरीजने रिलायन्स जिओबद्दल सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम शाखेने 700MHz बँडसाठी बोली लावली. तर ते $11 अब्ज (सुमारे 88,000 रुपये) कोटीपर्यंत खर्च करू शकतात. तसेच Jio 5MHz स्पेक्ट्रमसाठी देखील बोली लावू शकते, ज्याची किंमत 19,600 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
अहवालात भारती एअरटेलच्या संदर्भात लिहण्यात आले आहे कि, देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल 3.3 GHz च्या 100MHz स्पेक्ट्रमसाठी बोली लावू शकते. त्यांच्याकडून 26 GHz च्या 800MHz बँडसाठी देखील मोठी बोली लावली जाऊ शकते. यासोबतच ते 900MHz आणि 1800MHz साठी देखील बोली लावू शकतात. जर त्यांनी या सर्व विकत घेण्यासाठी बोली लावली तर एअरटेल या लिलावात $6 बिलियन (सुमारे 48,000 कोटी रुपये) खर्च करावा लागू शकतो.
व्होडाफोन-आयडिया ही कंपनी देखील A सर्कल आणि मेट्रोच्या 3.3GHz च्या 50MHz बँड आणि 26GHz च्या 400MHz बँडसाठी बोली लावू शकते, ज्यावर कंपनी 18,400 कोटी रुपये खर्च करू शकते.
महत्वाच्या बातम्या:
- Udhdav Thackeray : शिंदे गटाविरुद्धच्या संघर्षात उध्दव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा
- Arjun Khotkar | “होय, मी तसं बोललो होतो”; राऊतांच्या खुलास्यावर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया
- sanjay raut | खोतकर म्हणाले, दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; संजय राऊतांचा खुलासा
- Uddhav Thackeray | “मुले आईला विकायला बाहेर पडली, हे अतिशय…” ; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात
- Uddhav Thackeray | “2 नंबरच्या नेत्याने 2 नंबरचे काम केले” ; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<