2018 मध्ये या नवीन जोड्या प्रेक्षकांना भेटणार

in-2018-these-new-pairs-will-meet-the-audience

टीम महाराष्ट्र देशा :  2017 मध्ये सिल्व्हर स्क्रिनवर अनेक नवीन जोड्या आपल्याला रोमान्स करताना दिसल्या. आता नवीन वर्षातसुद्धा मोठ्या पडद्यावर अनेक फ्रेश जोड्या प्रेक्षकांना भेटणार आहेत.  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’मध्ये दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर पहिल्यांदा एकत्र स्क्रिनवर झळकणार आहेत.

shahid and deepika padmavati ‘गली बॉय’ या चित्रपटात आलिया भट आणि रणवीर सिंग यांची जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे. हा चित्रपट झोया अख्तर दिग्दर्शित करत आहे.

Gully Boy will star Ranveer Singh and Alia Bhatt

डायरेक्टर आर. बाल्की यांच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि राधिका आपटे ही जोडी पहिल्यांदा स्क्रिनवर एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहे.

Akshay Kumar & Radhika Apteडायरेक्टर शशांक खेतन यांच्या ‘धडक’ या चित्रपटात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर झळकणार आहेत. या दोघांचाही हा डेब्यू चित्रपट आहे. येत्या जुलै महिन्यात चित्रपट रिलीज होणार आहे.

Janhvi Kapoor and Ishaan Khattar's Dhadakडायरेक्टर आणि अॅक्टर सनी देओल त्याचा मुलगा करण देओलला लाँच करण्यासाठी ‘पल पल दिल के पास’ हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात करणसोबत शहर लाम्बा ही नवोदित अभिनेत्री स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपट डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे.

blankडायरेक्टर अभिषेक कपूर यांच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतची जोडी सारा अली खानसोबत जमली आहे. या चित्रपटातून सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Sara Ali Khan To Romance Sushant Singh Rajput In Kedarnath

डायरेक्टर नीरज पांडे यांच्या आगामी ‘अय्यारी’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह यांची जोडी जमली आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहे.

blankदिग्दर्शक तरण मनसुखानी यांच्या ‘ड्राइव’ मध्ये सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी मोठ्या पडद्यावर रोमान्स करणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. हा चित्रपट मार्च महिन्यात रिलीज होणार आहे.

Actors Sushant Singh Rajput and Jacqueline Fernandez have started shooting for their next film Driveडायरेक्टर शरत कटारिया यांच्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

Anushka Sharma And Varun Dhawan starrer film Sui Dhaagaडायरेक्टर मेघना गुलजार यांच्या आगामी ‘राजी’ या चित्रपटात विकी कौशल आणि आलिया भट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन स्पेस शेअर करणआर आहेत. हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे.blank

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर