औरंगाबाद : शनिवारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद नामांतराच्या विरोधात शहरातील विविध राजकीय संघटना, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदन देण्यासाठी यावे, असे आवाहन केले आहे. प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक ओळख असते. त्याबरोबर तिथे राहणाऱ्या नागरिकांचे एक नाते जुळलेले असते. औरंगाबाद हे नाव गेल्या ४०० वर्षांपासून आहे, त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी हे नाव बदलून संभाजीनगर नाव ठेवणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
येत्या १२ तारखेला औरंगाबाद शहरात नामांतराविरोधात एक निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात सर्व धर्मीय नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. पुढे बोलताना जलील म्हणाले कि, “औरंगाबाद नामांतराचे षडयंत्र हे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी केले आहे, त्याचा मी निषेध करतो. त्यासाठी एक निषेध मोर्चा काढण्यात येणार असून त्या दरम्यान विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच या नामांतराविरोधात दोन प्रकारच्या लढाया लढायच्या आहेत. एक लढाई न्यायालयीन असून दुसरी लढाई हि रस्त्यावर उतरून लढावी लागणार आहे”. तर आता इम्तियाज जलील यांनी केलेल्या आवाहनाला औरंगाबादचे नागरिक प्रतिसाद देणार का हे लवकरच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
- Sambhaji Chhatrapati : “ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर…”, संभाजी छत्रपतींची खंत
- Sanjay Raut : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी; संजय राऊतांची मागणी
- Amol Mitkari : “बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निधी द्यायचा पण…”, अमोल मिटकरींची शिंदे सरकारवर टीका
- Sanjay Raut । मला भविष्यात होणाऱ्या दुर्घटनाही माहिती आहेत – संजय राऊत
- Rohit Pawar : “केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत नाही पण…”,रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<