मुंबई : ठाकरे सरकारची (Thackeray Goverment) डोकेदुखी वाढवणारे शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मनधरणी कारण्यात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अपयश आले आहे. शिवसेनेकडून शिंदेंची मनधरणी सुरु आहे. मात्र आता त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाहीये. मात्र या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.
हा सारा शिवसेनेचा डाव आहे, असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच जनहिताच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा सारा खटाटोप सुरु आहे. शिवसेनेनेच हे सारं घडवून आणल्याचं देखील जलील म्हणालेत. जलील यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता चर्चांना वेगळं वळणं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच सध्या महाविकास आघाडी सरकार आता कोसळण्याची चिन्हे गडद झाली आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही शिजतंय का? याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच आज सकाळपासून एकनाथ शिंदेंचा बंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून सुरु आहे का? यासंदर्भात सोशल मिडीयावर चर्चां सुरु असताना पाहायला मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या :