इम्तियाज जलील यांची खासदारकी धोक्यात ?

टीम महाराष्ट्र देशा : एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील अडचणीत येण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. धर्माच्या नावावर मतं मागितल्यामुळे इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द करण्याची आणि त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्ह्याची कलमे लपवणे आणि खर्चाचा हिशोब न मांडणे या कारणावरून याचिका दाखल करण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान, इम्तियाज जलील यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं.
लोकसभा निवडणूकीतील बहुजन महापार्टी या पक्षातर्फे निवडणूक लढविलेले उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ऍड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यातर्फे ही याचिका सादर केली आहे. याचिकेमध्ये इम्तियाज जलील यांची निवडणूक रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. याचिकेत निवडणूक आयोग, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह निवडणुकीतील सर्वच उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण