वाकला–चांदेश्वर जलप्रकल्पाचा खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आढावा

mp jalil

औरंगाबाद : वैजापुर तालुक्यातील वाकला–चांदेश्वर जलप्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून प्रकल्प पुर्ण झाल्यास दुष्काळातही परिसरातील सर्व गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयात आढावा बैठक घेतली. वाकला–चांदेश्वर साठवण तलाव हा प्रकल्प औरंगाबाद व नाशिक जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वैजापूर तालुक्यातील वाकला गावाजवळ तापी खोऱ्यातील हत्तीघोडा नाल्यावर आहे. सदरील प्रकल्प वेळेत पुर्ण होणे अत्यंत गरजेचे असल्याने गोदवरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे मागील ३ वर्षापासुन खासदार इम्तियाज जलील सतत पाठपुरावा करत आहे.

हा प्रकल्प ६०० हेक्टर्सपेक्षा कमी सिंचन क्षमतेचा असल्यामुळे जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याने कामास अधिक विलंब झाला. खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील प्रकल्प विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाकडे परत हस्तांतरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

बैठकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी जायकवाडी धरणातील संकल्पीत पाणीसाठा, गाळ काढणे, पिण्याचे पाण्याचे व उद्योगधंदे करिता पाण्याचे आरक्षण विषयी चर्चा केली. जायकवाडी धरण सलग तीन वर्षापासुन पुर्ण भरत असतांना सुध्दा शहरात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या फार जुनी झाल्याने व समांतर जलवाहिनी घोटाळ्यात अडकल्याने तसेच महानगरपालिकाने वेळेवर नियोजनबध्द उपाययोजना केली नसल्यामुळे नागरीकांना वेळेवर मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याची खंत व्यक्त केली. शहराला ४ टिएमसी पाणी पुरवठ्याची गरज असतांना सद्यस्थिती फक्त १.५ टिएमसी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरीकांना पाण्यासाची भटकंती करावी लागत आहे. शहरात सध्या नविन १६८० कोटी रुपयाची जलवाहिनी योजनाचे काम प्रगतीपथावर असुन काम पुर्ण झाल्यावर मुबलक पाणी मिळणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या