जागावाटपासाठी खासदार इम्तियाज जलील हैदराबादला रवाना

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या जागा वाटपाबाबत 26 ऑगस्टला प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांची बैठक होणार आहे. याच बैठकीतून दोन्ही पक्षातील जागेचा तिढा सुटणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीतील केलेल्या मतदानावरून सुरु झालेल्या वादामूळे विषयी तक्रार घेऊन खासदार इम्तियाज जलील हैदराबादला रवाना झाले आहे.

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार नव्हता. पक्षाने कोणालाही पाठिंबाही जाहिर केला नव्हता.अशातच एमआयएमच्या 26 नगरसेवकांनी मतदान केले होते.या मतदानामूळे शिवसेनेला मदत झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे नेते एमआयएमच्या संपर्कात होते. यात काहीतरी काळेबेरे झाल्याचेही बोलले जात आहेत. यातच काही नगरसेवकांनी खुद्द खासदार इम्तियाज जलील आणि गटनेता नासेर सिद्दकी यांच्यावर नाराजी व्यक्त करीत एमआयएम पक्षाध्यक्ष ओवैसी यांची वेळही मागितली होती.

याच प्रकरणासह आगामी विधानसभेच्या जागेसंबंधी बैठकीस उपस्थित राहणाऱ्यासाठी खासदार इम्तियाज जलील हैदराबादला रवाना झाले होते. हैदराबाद मधील एम आय एम चे मुख्य कार्यालय दारुस सलाम येथे शनिवारी बैठक झाली तत्पूर्वी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खासदार इम्तियाज अनिल आणि असदुद्दीन ओवेसी हे सोबत होते. यासह आणखी दोन दिवस ते हैदराबादेत राहणार आहे. निवडणुकीतील हा प्रकरा विषयी आता थेट पक्ष कार्यालयातून काय आदेश निघणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

IMP