मी रझाकराची अवलाद, तर तुम्ही कोणाची अवलाद – इम्तियाज जलील

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिदिनाच्या माझ्या गैरहजेरी वरून विरोधक माझ्यावर टीकेची झोड उठवत आहेत. त्यांना माझा सवाल आहे की मराठवाड्याच्या मागासलेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काय केले. इतकी वर्षे सत्तेत होतात तरी या भागाचा विकास होऊ शकला नाहीत. फक्त 17 सप्टेंबरच्या दिवशी झेंडावंदनाला उपस्थित राहायचे आणि देशभक्ता होत आजचा ढोल बढवायचे, हे कितपत योग्य आहे. मला रझाकराची अवलाद म्हणणारे कोणाची अवलाद आहे. असा सवालही खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गेल्या चार वर्षापासून सातत्याने गैरहजर राहणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत जलील यांनी यांना विचारले असता ते म्हणाले शिवसेनेचे लोक मला रझाकारांची अवलाद म्हणतात. रझाकार 70 वर्षांपूर्वी पाकिस्तानात निघून गेले. पण आमचे या देशावर प्रेम आहे म्हणून आम्ही थांबलो.

हैदराबाद मराठवाडा मुक्तिसंग्राम हा एक इतिहास होता तो घडून गेला. त्यावरून आता राजकारण करणे आणि आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न निर्माण करणेही चुकीचे आहेत. आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. माझ्या अनुपस्थिती वरून रान पेटवणाऱ्यांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हेदेखील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला आपापल्या जिल्ह्यात हजार नव्हते. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. मुळात या मुद्यावरून सुरू झालेले राजकारण त्या लोकांची मानसिकता दर्शवतात मला यापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य द्यायचे आहेत. कारण लोकांनी मला विकासासाठी निवडून दिले आहे.

निवडणुकीची आचारसंहिता केव्हा लागू शकते त्यामुळे शहरातील काही विकास कामे मार्गी लावायची होती. त्यामुळे 16 तारखेला मुंबईला मिटिंग दुसऱ्या दिवशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मुलाखती होत्या. ह्या सगळ्याची नियोजन करताना 17 तारखेची आठवण राहिली नाही. ही माझी चूक झाली पण मी त्या दिवशी मुंबईत बोर्ड खेळत नव्हतो. तर शहरातील पाणचक्कीच्या विकासासाठी आणि शहर औरंगाबाद शिर्डी रस्त्यासाठी निधी मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बोलत होतो असे स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी दिले.