इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी सत्ता गमावल्यापासून देशभरातील विविध ठिकाणी सभांचं आयोजन करण्यास सुरुवात केली. तसेच इमरान खान यांच्या सभांना प्रतिसाद ही चांगला मिळत आहे. सियालकोटमधील सभेनंतर माघारी येत असताना इमरान खान यांच्या दोन्ही फोनची चोरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही फोन सियालकोट विमानतळावरुन चोरी करण्यात आली. हा दावा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे नेते शहबाज गिल यांनी केला आहे.
शहबाज गिल यांनी इमरान खान यांच्या सभेच्या दोन दिवसानंतर मोबाईल चोरीचा दावा केला आहे. इमरान खान यांच्या सभेला जाणीवपूर्वक सुरक्षा देण्यात आली नसल्याचा आरोप गिल यांनी केला आहे. सियालकोटमधील सभेत इमरान खान यांनी माझी हत्या झाल्यास ते व्हिडिओ प्रदर्शित करा, असं म्हटलं होतं. माझ्या जीवाला धोका आहे, जर खून झाल्यास रेकॉर्डिंग करुन ठेवलेला व्हिडिओ दाखवा, असं इमरान खान म्हणाले होते. इमरान खान यांनी त्यांची हत्या झाल्यास एक व्हिडिओ जारी करण्यात यावा, असं म्हटलं होतं.
या संदर्शभात बोलताना शहबाज गिल यांनी कुणाचं नाव न घेता तुम्ही मुर्ख आहात, इमरान खान यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ फोनमध्ये मिळणार नाही, हे समजायला हवं. इमरान खान यांचे मोबाईल फोन चोरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असा आरोप देखील शहबाज गिल यांनी केला आहे. इमरान खान यांना मारण्याचा कट देशात आणि परदेशात शिजल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –