fbpx

मोदींचे अनुकरण करत इम्रान खान यांनी दिला ‘स्वच्छ पाकिस्तान’चा नारा

टीम महाराष्ट्र देशा – पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या नुकत्याच भाषणात अनेक घोषणा त्यांनी केल्या. भारतात सत्तेत आल्यानंतर ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा नारा दिला होता अगदी तसाच नारा खान यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भारतात सुरू केलेल्या स्वच्छता अभियानासारखी योजना इम्रान खान यांनी पाकिस्तानात सुरू करण्याचे सूतोवाच केले. इम्रान खान यांनी स्वच्छतेला धर्माशी जोडत पाकिस्तानात स्वच्छता अभियानाची सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले. पाकिस्तान स्वच्छता आणि सुंदरतेच्याबाबतीत युरोपीयन देशांशी स्पर्धा करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार