इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे ‘हे’ दोन माजी क्रिकेटर राहणार उपस्थित

blank

मुंबई – पाकिस्तानचे माजी कसोटीपटू इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू आणि सुनील गावस्कर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यापैकी कपिल देव व नवज्योत सिंग सिद्धू हे या सोहळ्याला हजर राहणार आहेत. मात्र सुनील गावस्कर हे आपल्या वयक्तिक कामांमुळे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत.

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपल्याला पाकिस्तानात जाता येणार नसल्याचे गावस्कर यांनी एका वाहिनीला सांगितले, परंतु त्यांनी इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले,’स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही नेत्याकडून इम्रान खानसारखे प्रयत्न झालेले नाहीत. नव्या नेतृत्त्वाखाली बदलाचे वारे वाहत आहेत, अशी आशा मी सध्यातरी करू शकतो. क्रिकेटपटूने एखाद्या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणे, ही अभिमानास्पद बाब असल्याचं देखील त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटल आहे.

मुलाच्या लग्नासाठी महिला कॉंग्रेस नेत्याने केले मुलीचे अपहरण

भाजप मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा