इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली

इस्लामाबाद – पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत.

त्यानंतर आह सकाळी पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. त्यांना भारतीय वायुसेनेने लगेच पिटाळून लावले.

Loading...

या भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानचे अणुविषयक धोरण ठरविण्याची, संशोधनासंबंधी निर्णय घेण्याची व नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी नॅशनल कमांड ऑथॉरिटीकडं (एनसीए) आहे.

भारताच्या एअर स्ट्राइकनंतर काल पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती. त्यात अणुविषयक समितीशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इम्रान खान यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तानकडून नेहमीच अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जातात. आताही पाककडून असाच दबावाचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली असावी.

दरम्यान, संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल