लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा लवकरच मिळणार रुग्णालयातून सुटी

lata mangeshkar

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत असून लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. औषधोपचारानंतर त्यांच्या छातीतील जंतूसंसर्ग थोडा नियंत्रणात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते.

अलीकडेच निर्माते अनुज गर्ग लता दीदींच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, लता दीदींच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून पुढील आठवड्यात त्या घरी परततील. अनुज यांनी लता दीदींवर उपचार करणारे डॉ समदानी, डॉ जनार्धन आणि डॉ शर्मा यांनाही धन्यवाद दिले आहेत.

यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सप्त्नीक रुग्णालयातून जाऊन दीदींच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यांनीही दीदींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या