शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला – प्रिया बेर्डे

blank

पुणे : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी प्रिया बेर्डे यांचे चिरंजीव अभिनय हे देखील उपस्थित होते.

रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी इस्लामपूर येथे शेतकरी बचाव आंदोलन

शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं प्रिया बेर्डे म्हणाल्या. त्यांच्यासोबत अनेक कलाकारांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रिया बेर्डे म्हणाल्या, शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना माहित आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीची निवड केली. तसेच मला आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे.

राष्ट्रवादीने लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंत आणि तंत्रज्ञ यांना मोठी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचेने ३ हजार लोक कलावंतांना प्रत्येकी ३ हजार रुपये मानधन दिले. कोणताच गवगवा न करता, राष्ट्रवादीने कलाकारांना मदत केली.दरम्यान, प्रिया बेर्डे यांनी काही मागण्या केल्या. राज्य शासनाच्या जाहिरातीमध्ये मराठी कलाकारांना स्थान द्यावे. तसेच ज्येष्ठ कलावंताच्या मानधनात वाढ करावी. मालिका कलाकारांना ९० ऐवजी तीस दिवसात मानधन मिळावे, अश्या मागण्या त्यांनी केल्या.

महाजॉब्स पोर्टलची सुरुवात करून महाराष्ट्राने मोठी झेप घेतली – मुख्यमंत्री

या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह राजेश सरकटे (गायक) , सुधीर निकम (लेखक,दिग्दर्शक), जितेंद्र जादुगार , सुवासिनी देशपांडे (अभिनेत्री ), शंकुतला नगरकर (लावणी कलावंत), सिध्देश्वर झाडबुके (सिने अभिनेता), विनोद खेडकर (सिनेअभिनेता), संतोष साखरे (कार्यकारी निर्माता) मिलिंद अष्टेकर( माजी उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ,कोल्हापूर), आशू वाडेकर(अभिनेता), संग्राम सरदेशुख (सिनेअभिनेता), उमेश दामले (सिने अभिनेते ),संजय डोळे (लेखक/दिग्दर्शक) ,ओंकार केळकर (संगीतकार) आदी कलाकारांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.