भारताला पुरावे कसले मागतो? ‘जैश’वर कारवाई कर, घटस्फोटीत पत्नीने इम्रानला झापलं

इस्लामाबाद : पुलवामामध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. शहिदांच्या मृत्यूचा कोणत्याही परिस्थितीत बदला घ्या अशी जनभावना वाढीला लागली आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने भारताकडे पुराव्याची हास्यास्पद मागणी केली . मात्र इम्रानच्या घटस्फोटीत पत्नीनेच इम्रानला झापलं आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यासारख्या संघटनांवर आधीच कारवाई व्हायला हवी होती. जैशने तर पुलवामा हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे, असं ट्विट रेहम खानने केलं आहे.

इम्रान खान हे पाकिस्तानी सैन्याच्या हातचं बाहुलं असल्याची टीका मेहर खानने केली आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी इम्रान खानने जे स्पष्टीकरण दिलं ते सैन्याच्याआदेशानेच दिल्याचा दावा तिने केला. जैश ए मोहम्मद या संघटनेसोबत पाकिस्तान सरकारचा काही संबंध नसेलही, मात्र अशा संघटनांविरोधात काहीही कारवाई केलेली नाही, असं म्हणत रेहम खानने इम्रानला खडेबोल सुनावले.Loading…
Loading...