टी -20 विश्वचषक स्पर्धा होणे अशक्य ! मात्र भारत ऑस्ट्रेलिया दौरा खेळणार

austrelia vs india

क्रिकेट : यंदाच्या टी -20 विश्वचषक स्पर्धा होईल असे यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (सीए) वाटत नाही. मात्र , सीए प्रमुख केविन रॉबर्ट्सचा विश्वास आहे की भारतीय संघ वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर येऊ शकेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दोन्ही संघ 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळतील असे सांगण्यात येत आहे.

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी -20 विश्वचषक 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाव्हायरसमुळे सप्टेंबरपर्यंत परदेशी प्रवाश्यांवर बंदी आहे. अशा परिस्थितीत 16 देशांच्या या स्पर्धेची अपेक्षा अत्यंत कमी आहे.

रॉबर्ट्सने म्हटले आहे की कोरोनादरम्यान 15 संघ ऑस्ट्रेलियामध्ये आणणे आणि ही स्पर्धा घेणे अत्यंत कठीण जाईल. ते म्हणाले, “सध्या याबद्दल काहीही स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण गोष्टी हळू हळू सुधारत आहेत. भविष्यात काय शक्य आहे आणि काय नाही हे आपल्याला माहिती नाही. आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) या स्पर्धेबाबत पूर्णपणे निर्णय घेणे आवश्यक आहे.

त्याचवेळी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा डिरेक्टर ग्रॅमी स्मिथ म्हणाला की, टी -२० विश्वचषक होण्यापूर्वी आपण 14 सामने खेळू अशी अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. मला वाटते की विश्वचषक पुढे ढकलणे हा सर्वात चांगला पर्याय असेल. ही स्पर्धा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस आयोजित केली पाहिजे.

सोशल मीडियावर असे बोलले जात आहे की बीसीसीआय विश्वचषक पुढे ढकलण्याचा आणि त्याऐवजी आयपीएलची जागा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी या गोष्टी नाकारल्या. त्यांनी रॉयटर्सला सांगितले, “बीसीसीआय विश्वचषक तहकूब करण्यास सुचना का देईल? या प्रकरणात आयसीसीने घेतलेला निर्णय प्रत्येकजण स्वीकारतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपची घोषणा केली आणि ती चांगल्या पद्धतीने हाताळू शकली तर हा त्यांचा निर्णय आहे. बीसीसीआय कोणतीही सूचना देणार नाही.

महत्वाच्या बातम्या

गब्बर इज बॅक : मोठ्या खेळीसाठी शिखर उत्सुक

मला अशक्य असे वाटत नाही ! विराट कोहलीने आपल्या फलंदाजीबाबत केला मोठा खुलासा

युवराज सिंगने संघ निवड समितीवर केले गंभीर आरोप, म्हणाला…