Online Security: ऑनलाइन सुरक्षा कशी कराल…!

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. इंटरनेट, स्मार्टफोन व संगणक सेवेची सहज उपलब्धता हे यामागील करणे आहेत. सोबतच विविध शहरामध्ये मोफत वाय-फाय सुविधांचा भडीमार वाढत चालला आहे. जरी इंटरनेट सुविधांची सहज उपलब्धता असली तरी अलीकडे ‘डिजिटल वॉलेट’, ‘इंटरनेट बँकिंग’ यांच्या वापराचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे. यामुळे तुमची खाजगी माहिती सार्वजनिक होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इंटरनेट वापरताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच हि खास उपयुक्त माहिती तुमच्यासाठी…
टू स्टेप व्हेरिफिकेशन: ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ म्हणजे इंटरनेट खात्याच्या पासवर्ड शिवाय एक ‘व्हेरिफिकेशन कोड’ असतो त्याला OTP असेही म्हणतात. हा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवण्यात येतो. हा कोड प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन येत असतो व तुमच्या स्मार्टफोनवर येणारा क्रमांक कोणालाही समजू शकत नाही. शक्य असेल त्या वेळी तुमच्या विविध खात्यांच्या द्विस्तरीय पडताळणी अर्थात ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ करून घ्या.
अज्ञात राहून इंटरनेट ब्राऊजिंग करा: गुगल सर्च करत असाल तर शक्यतो ‘अनानिमोस’ अर्थात अज्ञात राहून इंटरनेट ब्राऊजिंग करा. कारण तुमचे ‘जीमेल’ खाते सुरू असताना, ‘गुगल सर्च’ वा अन्य कोणत्याही संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या ई-मेलसोबत तुमची वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी जमा होते.
पासवर्ड संरक्षण: घर उघडण्यासाठी जशी चावीची गरज असते तसेच इंटरनेटवर जाण्यासाठी (इंटरनेट वरील कोणतेही अकाऊंट) ‘पासवर्ड’ हि तुमची चावी असते. त्यामुळे तुमचा पासवर्ड हा इतरांच्या हाती पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे जावे यासाठी अनेक जण आपल्या सर्व प्रकारच्या इंटरनेट खात्यांना एकच पासवर्ड वापरतात. परंतु तो पासवर्ड इतरांना माहीत पडला तर तुमच्या अन्य खात्यांवरील माहितीही चोरली जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो पासवर्ड स्वतंत्र ठेवावेत.
अदृश्य’ राहा! : ऊजिंग करताना तुमची ओळख सार्वजनिक होऊ नये, यासाठी ब्राऊजर्सवर विविध  सुविधा असते. गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’, फायरफॉक्समध्ये ‘प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड’ किंवा मायक्रोसॉफ्टच्या ब्राऊजरवर ‘इनप्रायव्हेट’ या नावांनी ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधा तुमच्या संगणकात शिरकाव करू पाहणाऱ्या ‘हेर’ कूकीजना रोखते.
‘क्लीन अप’ करा: इंटरनेट वापरानंतर किंवा नवीन संकेतस्थळ हाताळल्यानंतर संगणक/ स्मार्टफोनवरील ‘कूकीज’, ‘कॅश’, ‘टेम्पररी फाईल्स’ हटवून टाका. कारण इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर त्या संकेतस्थळावरील काही फाईल्स आपल्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर जमा होत असतात. यातील काही ‘कूकीज’ तुमच्या माहितीचा माग काढत असतात.