मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले ‘हे’ सूचक वक्तव्य महत्वाचे-जयंत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले ‘हे’ सूचक वक्तव्य महत्वाचे-जयंत पाटील

jayant patil vs uddhav thackrey

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना–भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल असे म्हणत राज्य खळबळ उडवून दिली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे भाजपला सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता असेल, कारण काही लोक शिवसेनेत येणार आहेत. तशी गडबड गेल्या दोन दिवसांत दिसत आहे. हेच भाजपचे दोन मोठे नेते येत असावेत. हे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले सूचक वक्तव्य महत्वाचे आहे, असे जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले आहेत.

तसेच पाटील यांच्यापुढे शिवसेनेत येऊन मंत्री होण्याचा मार्ग आहे. पुढील दोन ते तीन दिवसात चमत्कार घडेल असे त्यांचे म्हणणे असून त्यांना जर मंत्री व्हायचे असेल तर तो चमत्कार इथेच होईल, असेही जयंत पाटील पुढे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या