Rajesh Tope | अमरावती : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाल्यानंतर नवीन राजकीय समीकरणाला सुरुवात झाली आहे. सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट राजकीय समीकरण बळकट करण्यात व्यस्त आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीशी उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा आहे. बीएमसी निवडणुकीत प्रकाश आंबेडकर शिवसेना एकत्र लढणार असल्याची चित्रे आहेत. यावर अमरावती येथील पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाचं विधान केलं.
“महाविकास आघाडी सशक्त होण्याच्या दृष्टिकोनातून भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे. प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. त्यंनी महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून यावं व आणखी महाविकास आघाडी घट्ट व्हावी यासाठी राष्ट्रवादी,शिवसेना, काँग्रेस एकत्र चर्चा देखील करतील तसेच वंचित व शिवसेनेची युती झाली तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेत्यांची चर्चा करून अधिकृतरित्या महाविकास आघाडी या निमित्ताने घट्ट करतील”, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने खासदार, आमदार, शिवसैनिक उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेले आहेत. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना राजकीय बळ देणाऱ्या साथीदाराची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करण्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी हिरवा झेंडा दाखवला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पक्षाची भूमिका आम्ही जाहीर केली आहे. शिवसेनेला आम्ही कळवले आहे की युती करायला आम्ही तयार आहोत. माध्यमांना सांगायचे आहे की काही गोष्टी जाहीर करायच्या असतील तर आम्ही जाहीर करु. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका.”
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Navneet Rana | उद्धव ठाकरे फक्त घरी बसून काम करतात – नवनीत राणा
- Devendra Fadnavis | “बेळगावला जाण्यापासून मंत्र्यांना कोणी रोखू शकत नाही, परंतु…” ; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Deepak Kesarkar | ” जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते, त्यांना…”, दीपक केसरकरांचा टोला
- Devendra Fadnavis | महाराष्ट्राला सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल – देवेंद्र फडणवीसh