संमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कार होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

टीम महाराष्ट्र देशा- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जोडीदारांनी संमतीने ठेवलेले शरीरसंबंध हा बलात्कार होत नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्रातील एका नर्स महिलेने एका डॉक्टरविरोधात दाखल केलेल्या निकालावर निर्णय देताना न्यायालयाने हा निर्णय दिला.

पीडिता आणि आरोपी दोन्ही काही दिवस एकत्र राहिले. आरोपीने दुसऱ्याशी लग्न केले असल्याचे पीडित महिलेला समजल्यानंतर तिने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीवर लावलेल्या आरोप पाहिल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं खंडपीठाने सांगितले.’’ दरम्यान,या नर्सने डॉक्टरविरोधात दाखल केलेला गुन्हाही कोर्टाने रद्द केला आहे.

You might also like
Comments
Loading...