जिओ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

टीम महाराष्ट्र देशा – जिओने ग्राहकांसाठी रिव्हाईज प्लॅन आणला असून यामध्ये 84 जीबी डेटा प्लॅनसह इतर प्लॅनच्या किंमती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जिओ आता 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 4.2 जीबी डेटा देणार आहे. कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 150 एमबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 300 मेसेज देणार आहे. 309 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी जिओने कमी केली असून यामध्ये मिळणारा डेटाही कमी केला आहे. या प्लॅनमध्ये अगोदर 56 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जायची, तर आता केवळ 49 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाणार आहे. दररोज 1 जीबी डेटाची मर्यादा देण्यात आली असून अमर्यादित व्हॉईस कॉलिंग असणार आहे. सर्वात लोकप्रिय असणाऱ्या 399 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटीही जिओने कमी केली आहे. हा प्लॅन आता 84 ऐवजी 70 दिवसांसाठीच मिळेल. ज्यामध्ये दररोज 1 जीबी या प्रमाणे 70 दिवसांसाठी 70 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग दिली जाईल.