देशाच्या सशक्त उभारणीमध्ये लष्करी ताकदीचा महत्त्वाचा वाटा- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

भारताच्या लष्करी इतिहासात अहमदनगरच्या आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल-एसीसीएसचं मोलाचं योगदान

देशाच्या सशक्त उभारणीमध्ये लष्करी ताकदीचा महत्त्वाचा वाटा असतो आणि भारताच्या लष्करी इतिहासात अहमदनगरच्या आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल-एसीसीएसचं मोलाचं योगदान आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले आहेत. अहमदनगरमधल्या एसीसीएस विभागाला आज राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा ध्वज प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेची अभिमानास्पद कामगिरीची परंपरा या पुढेही अविरत सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला लष्कर प्रमुख बिपीन रावत आणि अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.