मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक; पवार माढा लोकसभा लढणार की नाही समजणार

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईत एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेचे उमेदवार जाहीर करणर असल्याचे कळते आहे.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात सकाळी 11 वाजता ही महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करून उमेदवरांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालच अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुंबईत गुप्त भेट घेतली आहे. या दोघांमध्ये महाआघाडीच्या प्रवेशासंदर्भात जवळपास दीड ते दोन तास चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढा लोकसभा लढणार की नाही, हे सुद्धा आजच समजणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.