मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

uddhav thackrey

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत सात हजारांवर नवे रुग्ण झाले. मुंबई शहरातच हा आकडा हजाराच्या आसपास आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा जिह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अन प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विरोधक यावरून सरकारवर निशाणा साधत आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी शिस्त पाळावी, मास्क वापरावा असं आवाहन केले आहे. पुढील ८ दिवस महत्त्वाचे आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. १ फेब्रुवारीपासून मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी ठराविक वेळेसाठी खुली करण्यात आली, तेव्हापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, राज्यात अमरावती, अकोला, पुणे याठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे, मुंबईतही लोकलबाबत आणि संचारबंदीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या आठवड्याभरात राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. यानंतर, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन तर काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. येत्या काही दिवसांसाठी आंदोलने, राज्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या