मुंबई : 5 ऑक्टोबरला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. परंतू यावेळी दोन मेळावे पाहायला मिळाले. एक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दुसरा. दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जवळपास दहा कोटी रुपये खर्च केला असल्याचं म्हटलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर वकील नितीन सातपुते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
शिंदे गटाविरोधात नितीन सातपुते यांनी दाखल केलेल्या याचिकेतील महत्वाचे मुद्दे –
1. याचिकेमध्ये शिंदे गट कुठेही नोंदणीकृत नाही. मग शिंदे गटाकडे एवढा खर्च करण्यासाठी पैसा आलाच कुठून?, असा सवाल करण्यात आला आहे.
2. शिंदे गटाने राज्यभरातून 1700 बसेस आणल्या होत्या. मेळाव्यात 2 लाख लोकं आले होते. त्यांचं खाणं-पिण्याची सोय आदी खर्च कोणत्या पैशांतून करण्यात आला, याच्या चौकशीची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
3. मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरच युक्तिवाद करण्यात येतोय. 2 लाख लोक बीकेसीवर जमले होते तर एवढ्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्या, मंचाची व्यवस्था, लाइट्स आदी खर्च. त्याचबरोबर याचिकीमध्ये मुंबईभर लावलेल्या बॅनर्सवरीह प्रश्न करण्यात आला आहे.
4. 20 हजार ते 2 लाखांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाला तर आयकर विभागातर्फे चौकशी केली जाते. मग या व्यवहारातही तशीच चौकशी झाली पाहिजे, असं याचिकेमध्ये म्हटलं आहे.
5.या मेळाव्यासाठी सामान्य लोकांनी स्वच्छेने दान केलं, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. परंतू हा लंगडा बचाव आहे, असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. कारण सामान्य लोकांनी दान केलं असलं तरी लोकांनी कुणाच्या खात्यावर हा व्यवहार केला. तो एकच व्यक्ती असेल तर तो नेमका कोण आहे, याचीही चौकशी व्हावी, असं याचिकेमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mohan Bhagwat | ‘वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे’ म्हणत मोहन भागवत यांनी केलं मोठं वक्तव्य
- Nana Patole | नाशिकचा अपघात खड्ड्यांमुळेच ; नाना पटोले यांचा आरोप
- NANA PATOLE । “तुम्हाला जन्मदात्त्यांबद्दल अभिमान नाही, ही कुठली संस्कृती?”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचा सवाल
- Whatapp Update | आता Whatapp मध्ये बघता येईल ट्रेन अपडेट
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात काळ्या पैश्यांचा पाऊस? हायकोर्टात मनी लाँड्रींगची याचिका दाखल; ईडी करणार का चौकशी?