कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राजभवन प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

bhagat singh koshyri

मुंबई : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढताना दिसत आहे. या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात विशेषतः मुंबईत तर अजूनच परिस्थिती बिकट बनल्याचे चित्र आहे.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज (दि. २८ मे) राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत.

यापुढे राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरू करण्यात येऊ नये. केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी. पुढील आदेशांपर्यंत राजभवन येथे येणाऱ्या देशविदेशातील पाहूण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तु वा स्मृतीचिन्ह देऊ नये आणि पुढील आदेशापर्यंत राजभवन येथे कोणतीही नवी नोकर भरती करू नये, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे.तसंच, स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथील राजभवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा, असा निर्णयही राज्यपालांनी केला.

राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये आणि कुलगुरू आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घेऊन करून प्रवास खर्चात बचत करण्यात यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी केली.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये.कुलगुरु व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेऊन प्रवास खर्चात बचत करण्यात यावी.वरील उपाययोजनांमुळे राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये १० ते १५ टक्के बचत होईल असा अंदाज आहे. आपले एक महिन्याचे वेतन तसेच आगामी एक वर्षभर आपले ३० टक्के वेतन कोरोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.