मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोना थैमान घालण्याच्या दाट शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर राज्या निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही कोरोनाची रुग्णसंख्या अटोक्यात येताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊनबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
लॉकडाऊनबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. पण याच गतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर पर्याय नाही. काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील. राज्यात निर्बंध कठोर करण्याची आवश्यकता आहे. अद्याप शाळा, कॉलेज, हॉटेल, मॉल, सिनेमागृह बंद करण्याबाबत कोणताही विचार नाही. मात्र नागरिकांनी नियमांचे पाल न केल्यास किंवा कोणत्याही नियमांचे उल्लंघन करुन फिरत राहिले तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर आणखी कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
लॉक डाऊन जरी कुणी म्हणत असेल तरीसुद्धा लॉक डाऊनचा अर्थ आताच नाहीत. लॉक डाऊनचा विषय अजिबात नाही. त्यामुळे माध्यमांनी देखील लॉकडाऊनची भीती घालू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभाग टास्क फोर्ससोबत 2 तासांच्या झालेल्या प्रदीर्घ बैठकीत कुठेही लॉकडाऊनची चर्चा नाही. निर्बंध जरुर वाढवले पाहिजेत. लॉकडाऊनची भाषा आम्ही त्याचवेळेस करु जेव्हा 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचं कन्सप्शन होईल. त्यादिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल, अशा पद्धतीने ठरविण्यात येईल. त्यामुळे आज लॉकडाऊनबाबत चर्चा झालेली नाही. संख्या वाढतेय हे निश्चितच आहे, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
काहीही झालं तरी संख्या वाढतेय या पार्श्वभूमीवर जे निर्बंध घातले गेले आहेत त्याची कठोर अंमलबजावणी करणं हे शासनासमोर आव्हानात्मक आहे. संसर्ग वाढू नये या दृष्टीकोनातून उपाय करणं हे शासनासमोर प्रथम प्राधान्य आहे. त्याअनुषंगाने 30 डिसेंबरला रात्री नवे निर्बंध लागू करण्याचं जाणीवपूर्वक ठरवलं आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन तर…; मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा
- जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर ‘त्या’ मिम जोरदार चर्चा
- ‘बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध’
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<