Share

Eknath Shinde | “कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा” ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

(Eknath Shinde) मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठावाड्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सारखी पिकं काढून ठेवली होती. मात्र, पावसामुळे ही पिकं खराब झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेत दिलासा दिला आहे.

7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. युद्धपातळीवर शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 964 कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस, गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

परतीच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अशात सरकारी मदत कधी केली जाणार याबाबत प्रश्न विचारले जात होते. त्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

(Eknath Shinde) मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठावाड्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सारखी पिकं …

पुढे वाचा

Agriculture Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now