शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची मर्यादा वाढवण्यासह आज मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय !

मुंबई : आज (१० जून ) रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात महत्वाचा असलेला निर्णय म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाच्या घोषणा केली होती, त्या घोषणेच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.

जाणून घ्या मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय –

कांदळवन प्रवाळ संवर्धन

महाराष्ट्राला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन प्रवाळ संवर्धन, उपजीविकेलाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. ग्रीन क्लायमेट फंडाचे सहाय्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

आधी कर्जाची नियमित परतफेड शेतकऱ्यांना १ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजा दराने कर्ज मिळत होतं. मात्र, आता ३ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज मिळणार आहे.

मॉडेल आयटीआय

नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आयटीआय विकसित करण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

मुंबई सत्र न्यायालयात सरकारी वकील निुयक्ती

दुय्यम न्यायालय आणि मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमण्यात येणार आहेत.

हेरिटेज ट्री संकल्पना

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे शहरांमध्ये प्राचीन अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. हेरिटेज ट्री संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. हेरिटेज ट्रीद्वारे शहरातील झाडं वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या बातम्या 

 

IMP